कोविड-१९ च्या परिस्थितीत जेंव्हा भारतात लॉकडाऊन चालू झाला आणि मी सार्वजनिक वाहतूक पण बंद झाली आणि मी मुंबई मध्येच अडकलो त्या वेळी मी आणि माझ्या घरच्यांन्नी फोनद्वारे घेतलेली माझी काळजी आणि मला दिलेल्या नियम आणि सूचना.
(माझ्या दिवसाची सुरुवात त्यांच्या त्यांच्या फोन ने व्ह्यायची, आणि प्रत्येक एका तासाला त्यांचा मला फोन यायचा.)
सकाळी ८ वाजता : उठलास काय रे ? उठ आता आठ वाजलेत. तोंड धू चाहा बनाव नाष्टा कर.
९ वाजता : उठला नाही का रे अजून परियंत खूप आळशी झाला आहे हा मुलगा. उठ बाबा ज्यास्त झोपल्याने माणूस आळशी बनतो. चल उठ बर आता आणि मस्त पोट भरून नाष्टा कर.
१० वाजता : काय करत आहेस? घरी सगळं स्वयंपाकाचं सामान आणि बाकी सामान भरून ठेवला आहे ना आता बातम्या मध्ये दाखवले की आता दुकान फक्त सकाळी दोन तास आणि संध्याकाळी तीन चार तास सुरू राहणार, तर सगळं सामान नीट बघून आणून घे. आणि हो बाहेर जाशील तर तोंडाला वेवस्थीत बांधून जा बर का! आणि हो पैसे आहेत ना की टाकू तुझ्या खात्यात?
११ वाजता : आणला काय बाबू सामान? नीट चांगल्या पाण्यात दोन तीन वेळा धू त्यांना आणि तू पण आंघोळ करून घे आणि लगेच कपडे पण धोऊन घे त्यावरती पण जंतू असतात.
१२ वाजता: काय आज जेवायला काय बनवणार? टेन्शन नको घेऊ आमचा तू निवांत रहा आणि आणि पोट भरून खात जा नाही तर बिमार पडशील.
दुपारी १ वाजता : जेवलास काय रे? आणि तू ते पोलिसांकडे चौकशी केली का घरी येण्याच्या परवानगी साठी? जाऊन बघ ना तिकडे जर काही होत असेल तर ये घरी? खूप काळजी वाटतंय रे!
२ वाजता : काय करत आहेस? थोडा आराम कर आता काय काम नसेल तर! आणि बाहेर जाऊ नकोस. कोणाच्या जवळ जाऊन बोलू नकोस. जाशील तर तोंडाला काही कपडा बांधून जा.
५ वाजता : काय झालं काय चाहा पाणी??
संध्याकाळी ७ वाजता : काय बनवणार आज जेवण?
९ वाजता : झाला काय जेवण? कर मग आता आराम!
Categories: Uncategorized